भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!!
भारतीय उद्योगजगताचे दोन मानबिंदू धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचा आज जन्मदिन!!! 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्राला नवी झळाळी प्राप्त करून देणारे दोन उद्योगपती कै. धीरूभाई अंबानी यांचा आज जन्मदिन, तर श्री. रतन टाटा यांचे आज वाढदिवस. रतन टाटा आज ८६ वर्षांचे झाले. धीरूभाईंचे 6 जुलै 2002 रोजी निधन झाले. ते हयात असते, तर आज ते ९१ वर्षांचे झाले असते. भारतातील पहिले नामांकित उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांच्या कुटुंबात दत्तक गेलेले कै. नवल टाटा यांचे ते पुत्र. जे. आर. डी. टाटा यांच्या निधनानंतर रतन टाटा त्यांच्या समुहाचे प्रमुख बनले. 2002 पर्यंत त्यांनी टाटा सन्स या उद्योगसमुहाचे प्रमुखपद सांभाळताना समुहाच्या कक्षा विस्तारून त्या देशाबाहेरही पसरवल्या. ‘टेटली’, जग्वार लँड क्रूझर',कोरस’ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्या त्यांच्याच पुढाकारामुळे भारतीय मालकीच्या बनल्या. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांच्या प्रमुखपदावरून निवृत्ती स्वीकारली व सायरस मिस्त्री या 41 वर्षांच्या भाच्याकडे सूत्रं सोपवली. पण २०१६ मध्ये त्यांनी टाटा समूहा...