Posts

Showing posts from January, 2025

भारतीयांची घर आणि दार सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केल- अर्देशीर गोदरेज

Image
 भारतीयांची घर आणि दार सुरक्षित ठेवण्याच काम यांच्या कुलूपांनी केल- अर्देशीर गोदरेज सध्या ब्रॅंडचा जमाना आला आहे, कपड्यापासून ते घरातील चिजवस्तूपर्यंत अनेकजन ब्रांडेड वस्तुच वापरतात. पण हे ब्रॅंड काही आत्ताचे नाहीत. अनेक वर्षांचा इतिहास त्यामागे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रॅंडचा जमाना आहे. भारताला स्वतंत्र्य मिळण्याआधीच जागतिक स्तरावर आपल्या विश्वासाची मोहोर उमटविणारे नाव म्हणजे गोदरेज कंपनी. आणि या गोदरेजचे संस्थापक म्हणजे अर्देशीर गोदरेज.   चला तर आजच्या भागात जाणून घेऊ गोदरेजच्या कपाटबंद जन्माची ही कहाणी.  अर्देशीर गोदरेज यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 1868 मध्ये मुंबई प्रांतात बुरजोरजी आणि दोसीबाई गुठरजी या पारशी दाम्पत्त्याच्या पोटी एका सधन कुटुंबात झाला. त्यांना सहा अपत्ये. अर्देशीर सगळ्यात मोठा मुलगा. बुरजोरजी आणि त्यांच्या वडीलांचा बांधकाम क्षेत्रात व्यवसाय होता. १८७१ साली या कुटुंबाने गोदरेज हे आडनाव स्वीकारले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या अर्देशीरने पुढे जाऊन वकिलीचा अभ्यास केला. वकिलीची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक खटले लढवले, ...