मध ( Honey )
मध:- मध ही एक कीटकजन्य पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो. मधात जो गोडवा असतो तो मुख्यतः ग्लूकोज़ आणि एकलशर्करा फ्रक्टोज मुळे असते. मधाचा प्रयोग औषधि रूपात ही होताे. यात ग्लूकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो अम्ल पण असतात ज्यात अनेक पौष्टिक तत्व मिळतात. जखम ठीक करायला आणि उतकांच्या वाढी साठीच्या उपचारात मदत करते. अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो. http://www.renuudyogsamuh.com/honey/cid-91559574-91559574 मध कोठून मिळतो:- मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल...