मध ( Honey )
मध:-
मध ही एक कीटकजन्य पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे.
मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो. मधात जो गोडवा असतो तो मुख्यतः ग्लूकोज़ आणि एकलशर्करा फ्रक्टोज मुळे असते. मधाचा प्रयोग औषधि रूपात ही होताे. यात ग्लूकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो अम्ल पण असतात ज्यात अनेक पौष्टिक तत्व मिळतात. जखम ठीक करायला आणि उतकांच्या वाढी साठीच्या उपचारात मदत करते. अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.
http://www.renuudyogsamuh.com/honey/cid-91559574-91559574
मध कोठून मिळतो:-
मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्यांतून गोळा करतात.
आहेत.
1.ओमरेंदा मध महाराष्ट्र व कोयनेचे जंगल परिसरातून गोळा केला जातो. हा रंगाने पिवळसर आहे, तर मधाची चव स्वादिष्ट आहे.
करंजाचा मध महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांतून गोळा केला जातो. रंग मध्यम असून, मधाची चव कडवट व विशिष्ट आहे.
2.जांभळाचा मध हा सह्याद्रीच्या जंगलांत अधिक प्रमाणात गोळा केला जातो. रंगाने हा मध गडद, तर चवीने कडवट असतो. मधुमेह रुग्णांसाठी हा उत्तम शक्तिवर्धक मध आहे.
3.निलगिरीचा मध निलगिरीच्या जंगलात गोळा केला जातो. मधाचा रंग गडद असून, चव मात्र विशिष्ट असते. सर्दी-खोकला व दम्यासाठी हा मध उपयोगी पडतो.
4.मोहरीचा मध हा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांतून गोळा केला जातो. हा मध राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून गोळा केला जातो. या मधाचा रंग पांढरट पिवळा असून, या मधाची चव विशिष्ट असते. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हा मध अधिक शक्तिवर्धक समजला जातो.
5.लिचीचा मध उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांतून गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असून, चव विशिष्ट आहे. हा मध आरोग्यासाठी स्वादिष्ट आणि शक्तिवर्धक आहे.
6.शेवग्याचा मध हा बिहार आणि महाराष्ट्रात गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असला तरी चव मात्र स्वादिष्ट आहे. हा मध व्हिटॅमिन-ई युक्त असल्याने फायदेशीर ठरतो.
7.सूर्यफुलाचा मध महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातून गोळा केला जातो. सोनेरी, पिवळ्या रंगाचा हा मध असला तरी चवीला मात्र हा मध गुळचट आहे. हा मध उत्तम शक्तिवर्धक म्हणून ओळखला जातो.
8.हिरडागेळा हा मधसुद्धा सह्य़ाद्रीच्या जंगल परिसरामध्ये गोळा केला जातो. या मधाचा रंग गडद असून, चव मात्र तुरट आहे. या मधामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
मधाचे प्रकार:-
मधमाशी कोणत्या फुलाच्या मकरंदापासून मध तयार करते यावर मधाचे वर्गीकरण केले जाते. ही पध्दत अगदी काटेकोर पणे नाही पाळली जात, कारण एकाच वेळी दोन तीन वनस्पतींच्या फुलांपासून मकरंद गोळा करणाऱ्या मधमाश्याही आढळतात.
(१) विलगीकृत मध : केंद्रोत्सारक (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या) प्रेरणेने, गुरूत्वाकर्षणाने किंवा गाळप्याने पोळ्याच्या फण्यांतून काढलेल्या मधास हे नाव देतात. यात अनेक प्रकार आहेत : (अ) ज्यात दृष्य स्वरूपात साखरेचे स्फटिक नसतात असा मध, (आ) ज्यात साखरेचे व परिणामी मधाचे घनीभवन झालेले असते असा मध.
(२) फण्यांतील मध : हा फण्यांतच तयार होतो व बाजारात पुढीलप्रमाणे पाठविला जातो : (अ) चौकोनी वा काटकोन चौकोनी आकाराचे मध भरलेल्या फण्यांचे तुकडे (या तुकड्यांचे इतरही आकार असू शकतात), (आ) मधाने भरलेली पूर्ण फणी, (इ) विलगीकृत मध व मध भरलेल्या फण्यांच्या तुकड्यांचे मिश्रण.
आयुर्वेदातील मधाचे महत्व:-
आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत-
माक्षिक
भ्रामर
क्षौद्र
पौतिक
छात्र
आर्ध्य
औद्दालिक
दाल
मधाच्या एका नमून्याचे विश्लेषण फ्रक्टोज़: ३८.२% ग्लूकोज़: ३१.३% सकरोज़: १.३% माल्टोज़: ७.१% जल: १७.२% उच्च शर्करा:१.५% भस्म: ०.२% अन्य/अज्ञात: ३.२%
आयुर्वेदात मध हा औषध म्हणून वापरण्यात येतो. अनेक औषधे मधातून देतात. आयुर्वेदानुसार मध दिवसाच्या कोणत्या वेळी सेवन केला जातो आणि थंड पाण्यातून की कोमट यांप्रमाणे मधाचे औषधी गुणधर्म बदलतात.
नियमित मध आणि लिंबू घेतल्याने वजन कमी करण्यापासून तजेल त्वचेपर्यंतचा अनेक फायदे होतात.
1. लिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मधामध्ये ॲन्टिबॅक्टेरिअल तत्त्वे असतात. ही तत्त्वे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात. लिंबू आणि मध यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया चांगली होते.
2. मध रोज खाल्याने त्वचेवर संक्रमणाचा आणि ॲलर्जीचा धोका कमी होतो. ३. वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते.
3. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट्स असतात. ही खाल्याने शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो आणि मधात लिंबाचा रस टाकला तर ऊर्जा अधिक वाढते.
4. मध आणि लिंबूमध्ये असलेली ॲन्टिऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
मधाचे फायदे:-
1. मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
२) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.
३) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.
४) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.
५) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
६) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
७) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.
८) उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
९) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
१०) चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.
११) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
१२) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.
१३) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.
१४) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.
१५) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.
तुमच्या माहितीसाठी:-
मधाची शुध्दता तपासण्यासाठी मधाचे काही थेंब पाण्यात टाकून पाहावेत, खरा मध पाण्यात न मिसळता तळाला बसतो तर नकली खोटा मध पाण्यात विरघळत मिसळतो.
Comments
Post a Comment