कृषी महोत्सव
श्री स्वामी समर्थ!प.पू.गुरुमाऊलींचे आशिर्वादाने आदरणीय गुरुपूत्र कृषीरत्न श्री आबासाहेब यांचे मार्गदर्शनाने कृषीमहोत्सव नियोजन बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व केंद्रातील सेवेकरी यांनी योग्य रीतीने करुन जास्तीतजास्त सेवेकरी शेतकरी बांधवांना या कृषी महोत्सवास घेऊनं यावे ही विनंती. जि.प्र.बीड
https://youtu.be/czoUeaCltOA
श्री स्वामी समर्थ!प.पू.गुरुमाऊलींचे आशिर्वादाने उपासनेच्या आणि सेवेच्या माध्यमातून केलेल्या भक्तीचे फळ निश्चित मिळते-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून अखंडितपणे धार्मिक संस्कार आणि त्याचे विचार भाविकांपर्यंत पोहोचवले जातात हे विशेष असून उपासनेच्या आणि सेवेच्या माध्यमातून केलेल्या भक्तीचे फळ निश्चित मिळते असा विश्वास माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
आज बीड शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भाग्यनगर येथे श्री दत्तजयंती सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सायंकाळच्या महाआरती प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी दिनकर कदम, बडगे बापू, नानासाहेब काकडे, अरुण नाना डाके, ॲड. अजय राख, नगरसेवक भिमराव वाघचौरे, नितीन धांडे, प्रा. गोविंद साळुंके, प्रा. सतीश पोकळे गोसावी शास्त्री, संभाजी राव डावकर, अमोल मुंडे, दिलीप वाघ, अक्षय काळे, नवनाथ नलवडे, तिवारी, संजय ढोकणे व अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, यावर्षी अनेक ठिकाणी श्री दत्त जयंती निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेतश्री स्वामी समर्थ सेवा मार्गात केवळ आध्यात्म व त्यावर मार्गदर्शन नव्हे तर प्रत्यक्षात संस्कार करणारे विचार रुजवले जातात. श्रद्धेच्या बाबतीत बीड जिल्ह्यात अनेक भाविक मनोभावे परमेश्वराची अर्थात दत्त महाराजांची स्वामी समर्थ रुपात आराधना करतात. भगवंताची भक्ती करण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही मनोभावे सेवा करा उपासनेच्या माध्यमातून केलेल्या भक्तीतून इच्छित फलप्राप्ती होते मनातली भीती घालवण्यासाठी नामजपाचा योग्य उपयोग होतो चंचल मनाला स्थिर करण्यासाठी दिवसातून थोडावेळ आपण परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे गरजेचे आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी मनाची शुद्धता करण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करणे गरजेचे आहे शुद्ध मनाने केलेली भक्ती आणि केलेल्या कार्याचे फळ नक्कीच मिळते मनाला मजबूत आणि सशक्त ठेवण्यासाठी एकाग्रतेची गरज असते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा याप्रमाणे प्रत्येक मानव हा पराधीनता आहे हा प्रत्यय गेल्या दोन वर्षात आला आहे. एका अदृश्य विषाणूमुळे साऱ्या जगाला याचा अनुभव आला आहे. यातून बाहेर पडायचे असेल एकमेकाला समजावून घ्यावे लागेल दुसऱ्यांच्या प्रति आदर ठेवायला हवा मने कलुषित होता कामा नयेत. यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्रात आलेल्या उपासकाला मन शांती मिळते.या स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख प.पू गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यात जवळपास 70 ठिकाणी सेवा केंद्र चालू आहेत. त्यामुळे बीड शहराच्या अध्यात्मिक क्षेत्रात सेवा केंद्राचे कार्य उत्तम रित्या चालू आहे. असे सांगून त्यांनी दत्तजयंतीनिमित्त भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी महिला पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment